इराणची सर्वात मोठी युद्धनौका रहस्यमयरित्या बुडाल्याने खळबळ

0

तेहरान : इस्त्रायलसोबत सुरु असलेल्या तनावामध्ये इराणला जबर धक्का बसला आहे. ओमानच्या समुद्रकिनाऱ्याजवळ तैनात असलेली सर्वात मोठी युद्धनौका रहस्यमयरित्या आग लागून बुडाल्याने खळबळ उडाली आहे. या युद्धनौकेची आग एवढी भीषण होती की, अंतराळातूनदेखील दिसत होती. युद्धनौकेवर उंच उंच आगीच्या ज्वाळा दिसत होत्या. य़ा युद्धनौकेचे नाव खर्ग होते. हे जहाज मुख्य तेल टर्मिनलच्या रुपात इराणसाठी काम करत होते. युद्धनौकेला लागलेल्या आगीचा कारण अद्याप समजू शकलेले नाही. युद्धनौकेवरील सर्व कर्मचाऱ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. खर्ग जहाज एका ट्रेनिंग मिशनवर गेले होते. रात्री जवळपास सव्वा दोन वाजता या जहाजाला आग लागली. अग्निशमन दलाने ही आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, २० तासांच्या प्रयत्नानंतरही हे जहाज जस्क बंदराजवळ बुडाले. 

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

सोशल मीडियावर या बुडत्या जहाजाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. आग एवढी भयानक होती की, धुराचे लोट अंतराळातूनही दिसत होते. खर्ग युद्ननौका इराणसाठी एवढी महत्वाची होती, की ती अन्य जहाजांची गरज लागल्यास जागा घेत होते. मल्टीटास्किंग जहाज होते. तसेच मोठ्या प्रमाणावर युद्धसामग्री, साहित्या घेऊन जाऊ शकत होते. हेलिकॉप्टरदेखील यावरून उड्डाण करू शकत होते. ही युद्धनौका इराणने 1984 मध्ये घेतली होती. ब्रिटनने ही युद्धनौका 1977 मध्ये तयार केली होती.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:44 PM 02-Jun-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here