उद्धव ठाकरेंच्या मेव्हणीच्या कारला भीषण अपघात

0

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मेहुणी वीणा कारंडे यांच्या गाडीचा मंगळवारी रात्री अपघात झाला. शिर्डी-सिन्नर रस्त्यावरील पांगरी गावाजवळ ही घटना घडली. या अपघातात वीणा कारंडे आणि त्यांचे पती अजय कारंडे गंभीर जखमी झाले होते. या दोघांनाही तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान अजय कारंडे यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वीणा कारंडे आणि त्यांचे नातेवाईक शिर्डीवरून साईबाबांचे दर्शन घेऊन परतत होते. यावेळी पांगरी गावाजवळ चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कार पुलावरून जाऊन खाली कोसळली. या अपघातात गाडीतील चार जण गंभीर जखमी झाले. या सगळ्यांना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. यापैकी अजय कारंडे यांचा अपोलो रुग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यू झाला. तर मनिषा मिश्रा आणि वीणा कारंडे यांची प्रकृतीचा धोका टळला असला तरही त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here