“ओ परबांनू, मंत्री पदाचो राजीनामो आजच देऊन टाका, उगाच उद्या इज्जत जावुक नको, आयकतास ना! “

0

मुंबई : शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्याविरोधात भ्रष्टाचाराची तक्रार झाल्यानंतर विरोधकांनी अनिल परब यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यात भाजपा आमदार नितेश राणे यांनी कोकणी भाषेत अनिल परबांच्या राजीनाम्याची मागणी केली. परिवहन खात्यात भ्रष्टाचार झाल्याप्रकरणी नाशिक येथे गुन्हा दाखल झाला होता त्यामुळे अनिल परब यांच्या अडचणीत वाढ झाली. सचिन वाझे प्रकरणातही अनिल परब यांच्यावर आरोप झाले होते. त्यानंतर नाशिक येथील परिवहन कर्मचाऱ्यांच्या तक्रारीनंतर अनिल परब गोत्यात आले. आमदार नितेश राणेंनी ट्विट करत म्हटलंय की, ओ परबांनू, मंत्री पदाचो राजीनामो आजच देऊन टाका. उगाच उद्या इज्जत जावुक नको. आजच उरलीसुरली लाज वाचवा आयकतास ना” असा टोला अनिल परब यांना लगावला आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:08 PM 03-Jun-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here