मालवण तालुक्यातील बांदिवडे येथील श्री पावणाई भगवती मंदिरामध्ये १७ जानेवारी रोजी गोंधळ उत्सव होणार आहे. यानिमित्त सकाळी देवीची पुजापाठ, ओट्या भरणे, रात्री गोंधळ कार्यक्रम होणार आहे. गोंधळ कार्यक्रमानिमित्त आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. उपस्थितीचे आवाहन करण्यात आले आहे.