भारताची एम. सी. मेरी कोमला बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक

0

नवी दिल्‍ली : भारताची ‘सुपरमॉम बॉक्सर’ एम. सी. मेरी कोम हिने रविवारी इंडोनेशियात झालेल्या 23 व्या प्रेसिडेंट चषक बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले. 51 किलो गटात झालेल्या अंतिम फेरीत मेरी कोमने ऑस्ट्रेलियाच्या एप्रिल फ्ंैरक्स हिला 5-0 असे एकतर्फी पराभूत केले. ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक मिळवणार्‍या 36 वर्षीय मेरी कोमने यावर्षी मे महिन्यात झालेल्या इंडिया ओपन स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते. परंतु, ऑलिम्पिक पात्रता मिळवण्यासाठी तिने आशियाई चॅम्पियनशिपमध्ये सहभाग घेतला नव्हता. सहा वेळा विश्‍वचॅम्पियनशिप मिळवणारी मेरी कोम यंदा सातव्यांदा हा किताब मिळवण्यासाठी रिंगमध्ये उतरणार आहे. ही स्पर्धा 21 सप्टेंबरपासून सुरू होईल. तत्पूर्वी, आपला हात आजमावण्यासाठी मेरी कोमने प्रेसिडेंट चषक स्पर्धेत सहभाग घेतला होता. 23 व्या प्रेसिडेंट चषक स्पर्धेचे विजेतेपद मिळवल्यानंतर मेरी कोमने एक व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट केला आहे. यामध्ये ती पोडियमवर उभी असून, मागे भारताचे राष्ट्रगीत वाजत आहे. तिने आपल्या कोचिंग स्टाफला धन्यवाद देताना म्हटले आहे की, माझ्यासाठी आणि माझ्या देशासाठी आणखी एक सुवर्णपदक ! विजयाचा अर्थ तुम्ही इतरांपेक्षा जास्त परिश्रम केले, असा होतो. मी माझ्या कोच आणि कोचिंग स्टाफची आभारी आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here