मालवणी लाईफ युट्यूब चॅनल, मिलिंद विद्याधर कांबळी, आणि श्री भद्रकाली देवस्थान कमिटी व कुणाल मयेकर यांच्या सहकार्याने खगोलशास्त्राचा उपक्रम श्री भद्रकाली मंदिर परिसरात घेण्यात आला. मुळचे मालवणचे हौशी खगोलशास्त्र अभ्यासक कु. मंदार गजानन माईणकर हे स्वतः अभियंता आहेत. गेली ८ वर्षे ते खगोलशास्त्राचा अभ्यास करत आहेत. यांनी विद्याथ्यांना शुक्रग्रह, चंद्र, कृतीका नक्षत्र, मृग तेजोमेघ, तारका समूह या संबंधिची संपुर्ण माहिती लॅपटॉप च्या सहाय्याने यावेळी मुलांना दिली. त्यांच्याकडे असलेल्या ६इंच टेलिस्कोप दुर्बीणीच्या सहाय्या ने या ग्रह ताऱ्यांचे दर्शन घडविले. सांनी चंद्र पुस्तकात, टिव्हीवर वा इंटरनेटच्या माध्यमातुन मोबाईलवर पाहिलाच असेल, पण खरा चंद्र दुर्बीणीच्या सहाय्याने जवळुन पाहण्या ची संधी रेवंडी गावातील विद्याथ्यांना या उपक्रमातुन मिळाली. शाळेमार्फत असे उपक्रम राबवणे कठीण जाते, कारण विद्यार्थी संख्या जास्त असते. पण गावातील मुलांकरीता ग्रामपंचायत मार्फत असे उपक्रम राबवणे सोपे आहे. इतर गावात जर असे उपक्रम त घ्यायचे असल्यास मंदार गजानन माईणकर (९४२०८८१०३१) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन मालवणी लाईफ युट्युब चॅनलचे लक्ष्मीकांत कांबळी यांनी केले आहे.
