कोरोनाला रोखण्यासाठी उत्तर कोरियाच्या हुकूमशहाचा अजब आदेश

0

संपूर्ण जगात कोरोनाने दहशत निर्माण केली आहे. यातच कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी उत्तर कोरीयाचा हुकूमशहा किम जोंग उनने सर्व कबुतरं आणि मांजरांना नष्ट करण्याचा कृर आदेश दिला आहे. कारण कबूतरं आणि मांजरं चीनच्या सीमेच्या माध्यमाने कोरोना व्हायरस पसरवतात, असे उनचे म्हणणे आहे. सूत्रांच्या हवाल्यानुसार, उत्तर कोरियात कोरोना व्हायरसचा प्रकोप रोखण्यासाठी हुकूमशहा जोंग उनकडून अनेक उपाय योजनांची घोषणा करण्यात आली आहे. 

कोरोनाला लगाम घालण्याच्या उपायांत, एक आदेश, भटक्या मांजरांना मारणे आणि चीनच्या सीमेतून देशात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या कुठल्याही पक्षाला गोळी घालणे, असाही आहे. नुकतेच सीमेजवळील हेसन येथे एका कुटुंबाला शिक्षा देण्यात आली होती. आपल्या घरात मांजर पाळण्यासाठी त्यांना 20 दिवस आयसोलेशन केंद्रात ठेवण्यात आले होते. सीमेवरील शहरांत आणि गावांत अधिकारी लोक पक्ष्यांना मारताना आणि मांजरी तसेच त्यांच्या मालकांना शोधताना दिसून आले आहेत. कोरियातील अधिकारी स्थानिक लोकांवर प्राण्यांना मारण्यासाठीही दबाव टाकत आहेत.

हुकूमशहा जोंग उन यांचा अंदाज आहे, की हे प्राणी आणि पक्षी चीनला लागून असलेल्या सीमेवरून धोकादायक व्हायरस आणत आहेत. रिपोर्टमध्ये म्हणण्यात आले आहे, की कोरियातील नागरिकांनी हा आदेश अतार्कीक असल्याचे म्हटले आहे. यापूर्वी एक असेही वृत्त आले होते, की उत्तर कोरियाच्या हुकूमशहाने एका अधिकाऱ्याच्या मृत्यूनंतर देशातील सर्व प्रमुख रुग्णालयांत चिनी औषधांच्या वापरावर बंदी घातली होती. मांध्यमांतील वृत्तांनुसार, 60 वर्षीय ब्यूरोक्रॅट हृदयाच्या आजाराचा सामना करत होता आणि जोंग उनच्या जवळचा म्हणून परिचित होता.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:28 PM 04-Jun-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here