ब्रिटन सरकारचा मोठा निर्णय; १२ ते १५ वयोगटातील मुलांना दिली जाणार फायझर ची लस

0

ब्रिटन : अद्यापही कोरोना विषाणू जगभरात थैमान घालत आहे. अनेक देशांना कोरोनाचा मोठ्या प्रमाणात फटका बसला होता. अंदाज वर्तवण्यात येत असलेल्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून मुलांचं संरक्षण करण्यासाठी ब्रिटनच्या सरकारनं मोठी घोषणा केली आहे. यानुसार १२ ते १५ वयोगटातील मुलांना फायझरची कोरोना प्रतिबंधात्मक लस दिली जाणार आहे. फायझर बायोएनटेकची लस या वयोगटातील मुलांसाठी सुरक्षित असल्याचं चाचणीदरम्यान दिसून आल्यानं ब्रिटनच्या औषध नियामकानं शुक्रवारी मंजुरी दिली.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
5:56 PM 04-Jun-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here