फडणवीस-पवारांच्या पहाटेच्या शपथविधीवर संजय राऊतांचे भाष्य; म्हणाले, ‘हे’ सांगणारा मी पहिला होतो

0

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीवर भाष्य केले आहे. पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही चुकचं होती असं म्हटलं आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी काल एका वेबिनारमध्ये अजित पवारांसोबत घेतलेली शपथ आणि स्थापन केलेलं सरकार ही एक चुक होती असं म्हटलं होत. यावर संजय राऊत म्हणाले की, ‘जेव्हा ते शपथ घेत होते तेव्हाही मी सांगितलं होतं. हे सांगणारा मी पहिला माणूस होतो. सकाळी ७ ला त्यांनी शपथ घेतली आणि १० ला मी सांगितलं होतं की, हे असं काही नाही आहे ते फार मोठी चुक करत आहेत. संध्याकाळपर्यंत अजित पवार आणि त्यांनी सगळी लोकं त्यांच्या छावणीत परत येतील’. यावर पत्रकारांनी पुढे असं विचारले की फडणवीस असं म्हणाले की शिवसेनेनं पाठीत खंजीर खुपसला म्हणून हे पाऊल उचलावं लागलं. यावर संजय राऊत म्हणाले की, ‘जे शिवसेनेला ओळखतात, शिवसेनेचं चारित्र्यं जे चारित्र्य आहे आणि बाळासाहेब ठाकरेंनी जी शिवसेना घ़डवली त्यात पाठीत खंजीर खुपसण्याला स्थान नाही. आम्ही समोरुन वार करतो. छत्रपती शिवाजी महाराजांचं आम्ही नाव सांगतो. तसेच, आम्ही छातीवर वार करतो आणि छातीवर वार झेलतो. परिणामांची पर्वा करत नाही. पाठीमध्ये खंजीर खुपसण्याचं काहीही घडलं नाही. तीन पक्ष ठरवून एकत्र आले आहेत. चोरुन एकत्र आले नाहीत. त्यामुळे खंजीर खुपसणं हे शब्द प्रयोग महाराष्ट्रात बुळबुळीत झाले आहेत’, असे ते म्हणाले आहेत

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:39 PM 05-Jun-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here