कोविडमुळे दगावलेल्या रुग्णांचे सामान आणि ज्वेलरी नातेवाईकांना मिळेना, मुख्यमंत्र्यांना पत्र

0

मुंबई : हॉस्पिटलमध्ये कोविड पेशंट मृत पावल्यानंतर त्याच्या जवळ असलेले पाकीट, डेबिट कार्ड्स, ज्वेलरी या महत्वाच्या वस्तू त्याच्या नातेवाईकांना मिळालेल्या नाहीत. यासंदर्भात अनेक तक्रारी राज्यभरातून आहेत. माजी आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांच्याकडे गोरेगाव पूर्व नेस्को कोविड सेंटर व अन्य ठिकाणावरुन अनेक तक्रारी आल्या आहेत. त्यांच्या वस्तू त्यांच्या जवळच्या नातेवाईकांपर्यंत पोहचवण्यासाठी आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना विनंती केल्याची माहिती डॉ. दीपक सावंत यांनी दिली आहे.मुख्यमंत्र्यांनी आपल्या तक्रारीची दखल घेतली असून पुढच्या आठवड्यात पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी, पोलीस अधिकारी यांच्या समवेत बैठक घेऊन राज्यासाठी पॉलिसी ठरवण्यात येईल, असे आश्वासन मंत्री सुभाष देसाई यांनी दिल्याची माहिती त्यांनी दिली.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:55 PM 05-Jun-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here