शिक्षण महर्षी स्वर्गीय गोविंदराव निकम आज ८५ वा जयंती महोत्सव

0

शिक्षण महर्षी स्वर्गीय गोविंदराव निकम यांचा ८५ वा जयंती महोत्सव सोहळा गुरुवार दिनांक १६ व १७ जानेवारी २०२० रोजी या कालावधीत सावर्डे येथील स्मृतीगंध या त्यांच्या स्मारकस्थळी आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त विविध कार्यक्रम होणार आहेत. गुरुवार दिनांक १६ जानेवारी रोजी सकाळी ८.३० वाजता भक्ती संगम यामध्ये शारदा संगीत, साहित्य, कला, क्रीडा अकादमी सावर्डे यांचा हा कार्यक्रम होईल. तर सकाळी १०.३० वाजता जयंती शुभारंभ होणारा हे प्रमुख अतिथी म्हणून सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीनिवास पाटील, माजी प्रशासकीय अधिकारी व शिवम प्रतिष्ठान घारेवाडी कराडचे संस्थापक अध्यक्ष इंद्रजित देशमुख उपस्थित राहणार आहेत. तसेच यावेळी शिक्षण महर्षी गोविंदराव निकम सह्याद्री पुरस्कार २०२० भारतीय समाज सेवा केंद्र चिपळूण यांना देण्यात येणार आहे. यानंतर इंद्रजीत देशमुख यांचे व्याख्यान होईल. दुपारी ३ वाजता संतोष चौधरी मुंबई यांचा कोळी लोकगीतांचा व नृत्याचा बहारदार दादुस आला रे हा कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी सात वाजता आरवली येथील श्री. गजानन लघाटे व सहकारी यांचे अभंगवाणी हा कार्यक्रम होईल. शुक्रवार दिनांक १७ जानेवारी रोजी सकाळी ९.३० वाजता गोविंदराव निकम जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा, सह्याद्री शिक्षण संस्था वर्धापन दिन वकृत्व स्पर्धा, सह्याद्री टॅलेंट सर्च या स्पधांचा बक्षीस वितरण सोहळा होईल. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय अधिकारी प्रवीण पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे, तहसीलदार जयराज सूर्यवंशी उपस्थित राहणार आहेत. सकाळी ११ वाजता सह्याद्री शिक्षण संस्था सावर्डे, प्राथमिक विभाग यांचा सह्याद्री बाल कलाविष्कार कार्यक्रम होईल. दुपारी २.३० वाजता व्यवसायिक महाविद्यालये, सह्याद्री शिक्षण संस्था सावर्डे यांचे सह्याद्री युवा कलाविष्कार कार्यक्रम होणार आहे. तर रात्री ८ वाजता नमन होईल. शुक्रवार दिनांक २४ जानेवारी रोजी स्वर्गीय गोविंदराव निकम स्मृतीदिन दिन होणार असून यावेळी सकाळी ८ वाजता स्वर्गीय गोविंदराव निकम स्मारक दर्शन व आदरांजली सकाळी १० वाजता भावांजली दुपारी १२ वाजता पसायदान व भावपूर्ण पुष्पांजली, सायंकाळी ७ वाजता सातारा पाडळी येथील ह. भ. प. संतोष डहानणे यांचे कीर्तन होऊन या जयंती महोत्सवाचा समारोप होईल.

HTML tutorial
LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here