कोकण रेल्वे मार्गावर मडगाव-सीएसएमटी विशेष गाड्या

0

रत्नागिरी : मध्य रेल्वेच्या सहकार्याने कोकण रेल्वे मार्गावर दादर ते मडगाव दरम्यान दोन विशेष रेल्वे गाड्या चालवल्या जात आहेत. या गाड्या पावसाळी वेळापत्रकाप्रमाणे 10 जून ते 31 ऑक्टोबरपर्यंत तर त्यानंतर नियमित वेळेनुसार धावणार आहेत. कोरोनाचे निकष पाळूनच हा प्रवास सुरु राहील असे कोकण रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले. कोकण रेल्वे मार्गावर सोडण्यात येणाऱ्या गाड्यांमध्ये मडगाव-मुंबई सीएसएमटी- मडगाव (01112/01111) दैनिक उत्सव विशेष एक्सप्रेस (पूर्णपणे आरक्षित) मान्सून वेळेप्रमाणे मडगाव येथून 10 जून ते 31 ऑक्टोबर या कालावधीत सायंकाळी 6:45 वाजता सुटेल. दुसऱ्या दिवशी सकाळी 5:50 वाजता मुंबई सीएसएमटीला पोहोचेल. तिचा परतीचा प्रवास मुंबई सीएसएमटीवरुन रात्री 22.05 वाजता सुटेल. ती मडगावला दुसऱ्या दिवशी दुपारी 12:10 ला पोचेल. ही गाडी मॉन्सूनपुर्वीच्या वेळापत्रकातील वेळेनुसार 9 जूनला सायंकाळी 6 वाजता सुटेल ती दुसऱ्या दिवशी सकाळी 5.50 वाजता मुंबई सीएसएमटीला पोहोचेल. या मार्गावरील दुसरी गाडी मडगाव जंक्शन-मुंबई सीएसएमटी-मडगाव डेली फेस्टिव्हल स्पेशल एक्सप्रेस (पूर्णपणे आरक्षित-01114/01113) ही मान्सून वेळापत्रकानुसार सोडण्यात येत आहे. 10 जून ते 31 ऑक्टोबर या कालावधीत मडगावहून रोजी सकाळी 8.30 वाजता सुटेल. ती त्याच दिवशी रात्री 9:40 वाजता मुंबई सीएसएमटीला पोहोचेल. या दोन्ही गाड्या करमाळी, थिविम, पेरणेम, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, आडावली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, पनवेल येथे थांबतील. या गाड्यांना 22 एलएचबी कोच असतील. प्रथम एसी 1, टू टायर एसी 1, थ्री टीअर 4, द्वितीय आसन 4 कोच, स्लीपर कोच 9, पॅन्ट्री कार 1, जनरेटर कार 2 आहेत. या गाड्यांचे आरक्षण 8 जुनपासून सर्व प्रवासी आरक्षण प्रणाली (पीआरएस) काउंटर आणि आयआरसीटीसी वेबसाइटवर सुरु होत आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:09 AM 07-Jun-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here