बंगळुरू : भाजपचे केंद्रीय नेते सांगतील तेव्हा मी मुख्यमंत्रीपद सोडेन. ते राजीनामा द्या असे सांगत नाहीत तोपर्यंत मी या पदावर आहे. राजीनामा द्यावा लागला तरीही मी काम करत राहीन असे कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांनी रविवारी सांगितले. येडीयुरप्पा यांना मुख्यमंत्रीपदावरून लवकरच हटविण्यात येईल अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्या अनुषंगाने पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले की, कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची वेळ आली तरी त्यानंतरही मी राज्याच्या विकासासाठी अहोरात्र काम करणे सुरूच ठेवणार आहे. जनतेच्या कल्याणासाठी मी सातत्याने झटत आहे. मला या पदावर यापुढील काळात ठेवायचे की नाही याचा निर्णय भाजपचे केंद्रीय नेतृत्वच घेईल.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:46 AM 07-Jun-21