व्यापाऱ्यांची दुकाने बंद ठेऊन कोरोनाचे संक्रमण आटोक्यात येत नाही हे आता स्पष्ट झालंय : गणेश भिंगार्डे, अध्यक्ष व्यापारी महासंघ, रत्नागिरी

0

◾ “आवश्यक नियम पळून सर्व दुकाने उघडण्यास आता परवानगी द्यावी”

रत्नागिरी : मागील दोन महिन्यापासून आम्ही आपली दुकाने बंद ठेऊन प्रशासनाला सहकार्य करतोय. आमची दुकाने बंद ठेऊनही कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत नाही. व्यापाऱ्यांची दुकाने बंद ठेऊन कोरोनाचे संक्रमण आटोक्यात येत नाही हे ह्यावरून दिसून येते. कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात न येण्यामागील कारणे प्रशासनाने अभ्यास करून शोधणे गरजेचे असल्याचे मत रत्नागिरी शहर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष गणेश भिंगार्डे यांनी व्यक्त केले आहे. यापुढे लॉकडाऊनच्या नावाखाली प्रशासनाने व्यापाऱ्यांना वेठीस धरू नये. आमची दुकाने बंद आहेत मात्र खर्च थांबत नाहीत. आता मात्र व्यापाऱ्यांना नुकसान सहन करणे शक्य नसल्याने व्यापाऱ्यांना आपला व्यवसाय सुरू करून आपला चरितार्थ चालवणे भाग आहे. आजपासून राज्यात अनलॉक ची प्रक्रिया सुरू झाली असून आपल्या जिल्ह्यामध्ये मात्र 9 जून पर्यंत लॉकडाऊन असल्याने व्यापारी आपल्याला 9 जूनपर्यंत सहकार्य करण्यास तयार आहेत. परंतु दि. 10 जूनपासून आपणाकडून व्यापाऱ्यांना शिथिलता मिळणे आवश्यक आहे असे मत व्यापारी महासंघाचे अध्यक्ष गणेश भिंगार्डे यांनी मांडले असून याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
01:17 PM 07/Jun/2021

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here