केंद्रीय लोक सेवा आयोगाने 20 ते 29 सप्टेंबर 2019 दरम्यान घेतलेल्या नागरी सेवा (मुख्य) परीक्षा 2018 च्या निकालाच्या आधारावर भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय विदेश सेवा, पोलीस आणि इतर केंद्रीय सेवा (गट अ आणि ब) करीता निवडीसाठी पर्सनॅलिटी टेस्ट (मुलाखत) आणि पात्र उमेदवारांचे अनुक्रमांक जाहीर केले आहेत. या उमेदवारांच्या मुलाखती येत्या फेब्रुवारी महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या ढोलपूर हाऊस, शहाजहान मार्ग, नवी दिल्ली इथल्या कार्यालयात होणार आहेत. यासाठी ई समन पत्र 27 जानेवारी 2020 पासून उपलब्ध होणार असून आयोगाच्या www.upsc.gov.in आणि www.upsconline.in या संकेतस्थळावरून हे पत्र डाऊनलोड करता येणार आहे.
