सिंधुदुर्ग जिल्ह्याची पर्यटनविषयक माहिती आता 50 भाषांत

0

सिंधुदुर्ग : निसर्गरम्य, मोहक समुद्रकिनारा असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची पर्यटनविषयक माहिती देश-विदेशात पोहचावी, यासाठी 50 भाषांमध्ये पर्यटन स्थळांची माहिती प्रकाशित केली जाणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन व्यावसायिकांनी एकत्र येत महासंघ स्थापन केला असून या महासंघाने हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे संपूर्ण देशात आणि जगभरात मार्पेटिंग करण्यासाठी जिल्ह्याची संपूर्ण माहिती असणारी अद्ययावत वेबसाईट तयार केली जाणार आहे. ही वेबसाईट हिंदुस्थानातील सर्व तसेच जगभरातील काही अशा 50 भाषांमध्ये तयार होईल, अशी माहिती जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष बाबा मोंडकर यांनी दिली. अशा प्रकारची वेबसाईट तयार करणारा सिंधुदुर्ग हा देशातील पहिला जिल्हा आहे. जिह्याची सर्व भाषांत वेबसाईट असावी, ही संकल्पना महासंघाचे कार्याध्यक्ष सतीश पाटणकर यांची असून त्याला महासंघाचे सोशल मीडिया प्रमुख किशोर दाभोळकर यांनी मूर्त स्वरूप दिले आहे. वेबसाईटवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनस्थळे, मंदिरे, चर्च, समुद्रकिनारे, गडकिल्ले, कृषी पर्यटन, लोककला, मालवणी पदार्थ, संस्कृती, जिल्ह्याचा संपूर्ण इतिहास, जिल्ह्याची निर्मिती आदींची माहिती मिळणार आहे. त्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाला चालना मिळणार आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:46 PM 07-Jun-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here