‘जीन्‍स वापरली अन् परदेशी चित्रपट पाहिले तर मिळणार मृत्यूदंड’; उत्‍तर कोरियाच्या हुकूमशहा किम जोंगचा नवा आदेश

0

प्‍योंगयांग : उत्‍तर कोरियाचा सनकी हुकूमशहा किम जोंग उन यांने नुकताच एक नवा कायदा आणला आहे. या कायद्यात, उत्‍तर कोरियातील परदेशी प्रभाव संपवण्यासाठी परदेशी चित्रपट, कपडे आणि अयोग्य भाषेचा वापर केल्यास मृत्यूदंडापासून ते कारागृहापर्यंतच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. यापूर्वी, किम जोंग उनने एका व्यक्तीला, तो केवळ दक्षिण कोरियन चित्रपटासह पकडला गेला म्हणून मृत्यूदंड दिला होता. यून मि सो त्यावेळी 11 वर्षांची होती तेव्हा उत्‍तर कोरियन व्‍यक्तीला मृत्यूदंड देण्यात आला होता. त्यावेळी, त्याच्या शेजाऱ्यांनाही या मृत्यूदंडाची संपूर्ण प्रक्रिया पाहण्याचा आदेश देण्यात आला होता. सो ने सांगितले, की जर तुम्ही ही मृत्यूदंडाची शिक्षा पाहिली नाही, तर तो राजद्रोह मानला जाईल. एवढेच नाही, तर अश्‍लिल व्हिडिओची तस्‍करी करून आणण्याची शिक्षा मृत्यूदंडही असू शकते, असेही उत्तर कोरियाचे सैनिक स्पष्ट करत होते.सो म्हणाली, हे पाहणे तिच्यासाठी अत्यंत वेदनादायी होते. माझे डोळे पाण्याने डबडबले होते. उत्‍तर कोरियाच्या सैनिकांनी त्या व्यक्तीला गोळी घातली होती. आपण कल्पना करा, की एक असा देश जेथे सरकारकडून सातत्याने लॉकडॉउन लावला जातो आणि इंटरनेटही नसते. तेथे कुठल्याही प्रकारचा सोशल मिडिया नाही. केवळ काही सरकारी टीव्ही चॅनलच आहेत. या चॅनल्सवर केवळ, देशातील नेत्यांना आपल्याकडून काय ऐकण्याची इच्छा आहे, हेच सांगितले जाते. अशी स्थिती उत्तर कोरीयाची आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:55 PM 07-Jun-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here