पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयाचे स्वागत : बाळ माने

0

रत्नागिरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात १८ वर्षांपुढील सर्वांचं लसीकरण केंद्र सरकार मोफत करणार असल्याची घोषणा केली आहे. तसेच येत्या दिवाळीपर्यंत रेशनवर मोफत धान्यसुद्धा मिळणार आहे, या निर्णयाचे स्वागत माजी आमदार बाळ माने यांनी केले. तसेच या निर्णयाचा लाभ रत्नागिरी जिल्ह्यातील लाखो लोकांना मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशवासियांशी संवाद साधला. त्यासंबंधी श्री. माने यांनी नरेंद्र मोदी यांच्या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त केले. आंतरराष्ट्रीय योग दिनापासून (२१ जून) देशातील सर्व राज्यातील १८ वर्षांपुढील सर्व नागरिकांच्या लसीकरणासाठी केंद्र सरकार राज्यांना मोफत लस उपलब्ध करून देणार असल्याने राज्य सरकारचार भार कमी होणार आहे, असे श्री. माने म्हणाले. लसीच्या निर्धारित किंमत वगळता खासगी रुग्णालये एका डोसला १५० रुपये सेवा कर आकारू शकतील. यावर देखरेख ठेवण्याचं काम राज्य सरकारांकडेच असणार आहे, ही चांगली गोष्ट असून याचा लाभ हजारो लोक घेऊ शकतात, असे माने म्हणाले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
7:51 PM 07-Jun-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here