आता तुम्ही स्वतः करू शकणार एटीएम कार्ड ‘स्विच ऑन – स्विच ऑफ’

0

अनेकदा लोक बँकिंग फ्रॉडचे शिकार झाल्यानंतर त्यांनी कार्ड बंद करण्यासाठी कस्टमर केअरला कॉल करावा लागतो. त्यानंतरच डेबिट अथवा क्रेडिट कार्ड बंद करता येते. मात्र आता आरबीआयने बँकेच्या ग्राहकांसाठी खास सुविधा आणली आहे.नवीन सुविधेनुसार, तुम्ही स्वतः कार्डला स्विच ऑन आणि स्विच ऑफ करू शकाल. तुम्हाला कस्टमर केअरला कॉल करण्याची गरज लागणार नाही. तुम्ही स्वतः कार्ड बंद करू शकाल.रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) बँक आणि कार्ड जारी करणाऱ्या अन्य कंपन्यांना ग्राहकांना डेबिट अथवा क्रेडिट कार्ड स्वतः बंद करणे आणि सुरू करण्याची सुविधा देण्यास सांगितले आहे. ग्राहकांना या प्रकारची सुविधा मोबाईल अॅप, इंटरनेट बँकिंग, एटीएम मशीन सारख्या माध्यमातून मिळू शकते. ही सुविधा 24 तास उपलब्ध हवी, असेही आरबीआयने सांगितले आहे. आरबीआयची ही सूचना प्रीपेड गिफ्ट कार्ड आणि मेट्रो कार्ड सारख्या कार्डसाठी लागू नसेल.आरबीआयने म्हटले आहे की, जे कार्ड आतापर्यंत ऑनलाईन पेमेंटसाठी वापरले गेले नाहीत. ते या प्रकारच्या व्यवहारासाठी बंद करण्यात यावेत.आरबीआयच्या या निर्णयामुळे कार्डद्वारे होणारे व्यवहार सुरक्षित होण्यास मदत होईल.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here