पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात वैयक्तिक भेट होणार?

0

नवी दिल्ली : आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधान मोदींची दिल्लीत भेट घेणार आहेत. अशातच या अधिकृत भेटीनंतर उद्धव ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख म्हणून मोदींची वैयक्तिक भेट घेऊ शकतात, अशी माहिती सुत्रांकडून मिळत आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतच्या वैयक्तिक भेटीची इच्छा पंतप्रधान कार्यालयाकडे व्यक्त केली होती. मराठा आरक्षण आणि राज्यातील इतर प्रश्नांबाबात राज्य सरकारच्या वतीनं मुख्यमंत्री आणि शिष्ठमंडळासोबतच्या मोदींची भेट पार पडल्यानंतर दहा मिनिटांची वैयक्तिक भेट असावी, अशा आग्रह मुख्यमंत्र्याचा आहे. मराठा आरक्षणप्रश्नी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीभेट घेणार आहे. मराठा आरक्षणाबरोबरच केंद्राकडे राज्याचे असलेली जीएसटीचे पैसे, तोक्ते चक्रीवादळात झालेले नुकसान आणि इतर मुद्दे या संदर्भात हे शिष्टमंडळ पंतप्रधानांना भेटणार असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठा आरक्षणविषयक उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर असं शिष्टमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी दिल्लीत दाखल झालं आहे. मुख्यमंत्री आणि शिष्टमंडळाचा ताफा भेटीसाठी पंतप्रधानांच्या निवासस्थानी पोहोचला आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:08 AM 08-Jun-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here