बनावट गुणपत्रिकांच्या आधारे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची फसवणूक

0

बनावट गुणपत्रिकांच्या चार परप्रांतीय विद्यार्थ्यांनी एमबीएला प्रवेश घेऊन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. चौघांवर चतुश्रृंग़ी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. चौघातील तिघे झारखंड येथील आहेत. तर, एक विद्यार्थी बिहार येथील आहे.अपराजिता राज (रा. बिस्तुपूर कालीमाली, जमशेटपूर, झारखंड), भोमिरा (मुफसिल बिहार, जि. गया), दिव्या सिंग, शैलेश कुमार सिंग (दोघेही, रा. झारखंड) अशी या चौघांची नावे आहेत. डॉ. सुरभी प्रवीण जैन यांनी विद्यापीठाच्या वतीने फिर्याद दिली आहे.याबाबत डॉ. जैन या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे प्राध्यापक आणि हेड ऑफ डिपार्टमेंट मॅनेजमेंट सायन्सेस या विभागाच्या प्रमुख म्हणून काम पाहतात. अेटीएमए (एआयएमएस टेस्ट फॉर मॅनेजमेंट ऍडमिशन्स) या परीक्षेद्वारे एमबीएसाठी प्रवेश दिला जातो. 2018-19 या शैक्षणिक वर्षासाठी एआयएमएस टेस्ट फॉर मॅनेजमेंट या संस्थेच्या बनावट गुणपत्रिका सादर करुन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे सादर करून एमबीएसाठी प्रवेश घेतला.त्यानंतर विद्यापीठाकडून या गुणपत्रिकांची खातरजमा करण्यासाठी त्या अेटीएमएकडे पाठविण्यात आल्या. तेव्हा त्यांच्याकडून या गुणपत्रिका आम्ही दिलेल्या नसून त्या बनावट असल्याची माहिती देण्यात आली. हा प्रकार उघड झाल्यानंतर आता पहिले वर्ष संपत असताना विद्यापीठाच्या वतीने या चार विद्यार्थ्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शेवाळे अधिक तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here