खासदार नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र अवैध, मुंबई उच्च न्यायालयाचे ताशेरे; खासदारकी धोक्यात?

0

अमरावती : अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार नवनीत राणा यांना जोरदार झटका बसला असून त्यांची खासदारकी धोक्यात आली आहे. नवनीत राणा यांनी सादर केलेले जात प्रमाणपत्र अवैध आहे आणि येत्या सहा आठवड्यात त्यांनी सर्व प्रमाणपत्रं जमा करावे असा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. या प्रकरणी खासदार नवनीत राणा यांना दोन लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने वरील निकाल दिला. अमरावती लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचीत जातींसाठी राखीव मतदार संघ होता. त्या मतदारसंघातून नवनीत राणा या निवडून आल्या होत्या. त्यांच्या या निवडीवर आक्षेप घेताना शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. अडसूळ यांच्या याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने खासदार नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र अवैध असल्याचं सांगितलं आहे. त्यांना दोन लाख रुपये दंड आणि सहा आठवड्यात सर्व प्रमाणपत्रक जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
12:43 PM 08-Jun-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here