महात्मा गांधींच्या पणतीला दक्षिण आफ्रिकेत 3.22 कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या गुन्ह्याखाली सात वर्षांची शिक्षा

0

डर्बन : एका व्यवसायिकाची आर्थिक फसवणूक केल्या प्रकरणी दक्षिण आफ्रिकेतील डर्बन इथल्या कोर्टाने महात्मा गांधींची पणती आशिषलता रामगोबिन यांना सोमवारी 7 वर्षांचा तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. महात्मा गांधींची पणती आणि इला गांधी व मेवा रामगोविंद यांची कन्या असलेल्या 56 वर्षीय आशिषलता रामगोविंद यांच्यावर स्थानिक व्यवसायिक एस.आर. महाराज यांची 6 मिलीयन दक्षिण अफ्रिकी रँडने (3 कोटी 22 लाख 84 हजार 460 भारतीय रुपये) फसवणूक केल्याचा आरोप आहे. आशिषलता रामगोबिन यांनी ऑगस्ट 2015 मध्ये न्यू आफ्रिका अलायन्स फुटवेअर वितरकांचे संचालक महाराज यांची भेट घेतली होती. महाराज यांची कंपनी कपडे, बुटांची निर्मिती,विक्री आणि आयात करते. महाराज यांची अन्य कंपन्यांना नफा-समभागांच्या आधारे पैसेही देते. दक्षिण आफ्रिकेच्या हॉस्पिटल ग्रुप नेटकेअरसाठी तागाचे 3 कंटेनर आयात केले आहेत अशी माहिती आशिषलता रामगोबिन यांनी महाराजा यांना दिली होती. आयात खर्च व सीमा शुल्क भरण्यासाठी आपल्याकडे पैशाची कमतरता आहे. तसेच बंदरावरुन सामान खाली उतरवण्यासाठी पैशांची आवश्यकता आहे असे लता यांनी महाराजा यांना सांगितले. त्यानंतर लताने त्यानंतर लताने महाराज यांना सांगितले की तिला 6 मिलीयन रँड गरज आहे आणि ते सिद्ध करण्यासाठी लताने वस्तू खरेदी केला असलेला एक कागद महाराज यांना पाठवला होता. त्यानंतर हा कागद खोटा असल्याचे समोर आल्यानंतर महाराज यांनी लता यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. याप्रकरणी आशिषलता रामगोविंद 2015 पासून जामिनावर होत्या. एस.आर. महाराज यांनी आशिषलता यांना मालाची आयात आणि सीमाशुल्कापोटी 6 मिलीयन रँड दिले होते. परंतु, महाराज यांच्याकडे कुठलाही माल पोहचवला नाही. तसेच आशिषलता यांनी नफ्यातील काही हिस्सा एस.आर. महाराज यांना देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्यांनी आपला शब्द पाळला नाही. याप्रकरणाच्या प्रदीर्घ सुनावणीनंतर डर्बन स्पेशलाइज्ड कमर्शियल क्राइम कोर्टाने आशिषलता रामगोविंद यांना सोमवारी 7 जून 2021 रोजी 7 वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली. 

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:11 PM 08-Jun-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here