जिल्हा वाहतूक पोलींसाच्या वतीने कणकवलीत रस्ते वाहतूक सुरक्षा अभियान

0

रस्ते सुरक्षा हा विषय प्रत्येकाच्या जीवनाशी निगडीत आहे. वाहतूक नियमांची जागरुकता व्हावी यासाठी पोलीस प्रशासनाकडून वेळोवेळी कार्यशाळा व्दारे किंवा पत्रकाव्दारे जनजागृती केली जाते. जर सवांनीच वाहन चालविताना काळजीपूर्वक वाहन चालविल्यास व वाहतुक नियमांचे काटेकोर पालन केल्यास अपघाताचे प्रमाण कमी होण्यास निश्चित मदत होईल. अपघाताचे प्रमाण शुन्य टक्के व्हावं यासाठी सर्वांच्या सहकायार्ची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हा वाहतुक पोलीस निरीक्षक अविनाश भोसले यांनी केले. जिल्हा वाहतूक पोलीस,सिंधुदुर्ग यांच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियान जनजागृती कार्यक्रम आयोजीत कणकवली उपजिल्हा रुग्णालय प्रवेशव्दारावर वाहनचालक नेत्र तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात ११३ हुन अधिक वाहनचालकांची मोफत तपासणी करण्यात आली.यावेळी जिल्हा वाहतूक सहाय्यक पोलीस निरीक्षक अरुण जाधव,उपजिल्हा रुग्णलयातील नेत्रतपासणी डॉ.चेतन कोरे, मोटार वाहन निरीक्षक अलमवार,विश्वजित परब,प्रकाश गवस,शशिकांत कदम,वस्त्याव पिंटो,सुनील निकम,अविनाश गायतोडे,व्ही.एस.देसाई,रविकांत बुचडे,आदी वाहतूक पोलीस,वाहनचालक,नागरिक उपस्थित होते.अरुण जाधव म्हणाले, जिल्हातील वाढते अपघात,वाहन नियम,तसेच अपघात रोखण्याच्या दृष्टीने माहिती दिली.याखेरीज जिल्हात दाखल झालेल्या नूतन स्पीडगन वाहनाची माहिती दिली. अभियायाव्दारे जनजागृती पोलीस स्टेशन व्दारे कायमच केली जाते.मात्र वाहतूक चालककानी ती आत्मसात करून वाहन चालवल्यास काही प्रमाणात का होईना अपघात रोखण्यास मदत होईल असे सांगत वाहतूक नियमांचे पालन करून सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.

HTML tutorial
LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here