कांद्याच्या दरात मोठी घसरण ?

0

दक्षिणेकडील राज्यात सध्या पोंगल सण साजरा केला जात असून तेथील बाजारपेठा बंद आहेत. याचा परिणाम पुण्यातील बाजारपेठांवर झाला आहे. पोंगल सण असल्या कारणाने तेथील बाजारपेठा बंद असून तेथून घाऊक बाजारात मोठय़ा प्रमाणावर कांदा विक्रीसाठी पाठविला जात आहे. मार्केटयार्डातील बाजारात आवक वाढल्याने कांद्याच्या दरात घसरण झाली आहे. घाऊक बाजारात दहा किलो कांद्याला २५० ते ३५० रुपये असा दर मिळाला असून किरकोळ बाजारात ३० ते ५० रुपये या दराने कांद्याची विक्री केली जात आहे.गेल्या काही दिवसांपासून नवीन कांद्याची बाजारात आवक सुरू झाली. त्यामुळे कांदा दर टप्याटप्याने कमी होत गेले. मकरसंक्रांतीप्रमाणे दक्षिणेकडील राज्यात पोंगल सण मोठय़ा प्रमाणावर साजरा केला जातो. त्यामुळे तेथील बाजारपेठा सलग तीन दिवस बंद राहिल्या. त्यामुळे बाजारात मोठय़ा प्रमाणावर कांदा विक्रीसाठी पाठविण्यात आल्याने दरात घसरण झाली, अशी माहिती श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्डातील कांदा व्यापारी रितेश पोमण यांनी दिली. दक्षिणेकडील बाजारपेठा बंद असल्याने तेथील व्यापाऱ्यांनी महाराष्ट्रातून कांदा खरेदी थांबविली आहे. तसेच स्थानिक बाजारात कांदा शिल्लक आहे. त्यामुळे कांदा दरात घसरण झाली आहे. गेल्या वर्षी झालेल्या मुसळधार पाऊस तसेच अवेळी पावसामुळे कांदा पिकाच्या लागवडीवर मोठा परिणाम झाला होता. शेतात कांदा भिजल्याने कांदा खराब झाला. साठवणुकीतील जुन्या कांद्याचे साठे संपत चालल्याने कांदा दरात मोठी वाढ झाली होती. महाराष्ट्रातील बाजारपेठांमध्ये कांद्याला उच्चांकी भाव मिळाला होता. दीड महिन्यांपूर्वी किरकोळ बाजारात एक किलो कांद्याची विक्री १२० ते १५० रुपये या दराने केली जात होती.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here