भारताची आघाडीवीर राणी रामपाल हिच्याकडे २५ जानेवारीपासून ऑकलंड येथे सुरू होणाऱ्या न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय महिला हॉकी संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. हॉकी इंडियाने गोलरक्षक सविता हिच्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवली आहे. या दौऱ्यातील भारताचा पहिला सामना न्यूझीलंडच्या डेव्हलपमेंट संघाविरुद्ध २५ जानेवारी रोजी तर न्यूझीलंडच्या महिला संघाविरुद्ध २७ आणि २९ जानेवारी रोजी उर्वरित दोन सामने होतील. त्यानंतर भारतीय संघ ४ फेब्रुवारी रोजी ग्रेट ब्रिटनशी दोन हात करेल आणि ५ फेब्रुवारी रोजी न्यूझीलंडच्या महिला संघाविरुद्ध होणाऱ्या सामन्याने या दौऱ्याची सांगता होईल.
महिला हॉकी संघ :
राणी रामपाल (कर्णधार), सविता, रजनी इथिमा’, दीप ग्रेस इक्का, गुरजित कौर, रिना खोखार, सलिमा टेटे, सुशीला चानू, निशा, नमिता टोप्पो, उदिता, मोनिका, लिलिमा मिन्झ, नेहा, सोनिका, शर्मिला देवी, नवनीत कौर, लालरेमसियामी, वंदना कटारिया, नवज्योत कौर.
