मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे जिल्ह्यात 11, 12 जून रोजी संचारबंदी

0

रत्नागिरी : दि. 11 व 12 जून या कालावधीत हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता असून जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. जिल्ह्यात 200 मिलीमीटरपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामुळे जिल्ह्यात 11 व 12 जून रोजी संचारबंदी लावण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली आहे.

या कालावधीत जिल्ह्यातील खेड, चिपळूण, राजापूर या तीन नगर पालिका आणि 31 गावे धोकादायक व पुरबधित आहेत. या ठिकाणी सुरक्षिततेच्या उपाययोजना आखण्यात आल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले. तसेच या भागातील नागरिक व ग्रामस्थांचे स्थलांतर करण्यात येणार आहे. किनारी भागात हाय टाईड आणि पाऊस याचा धोका असल्याने किनारी भागातील ग्रामस्थांचे स्थलांतर केले जाईल. पुराचा धोका लक्षात घेऊन जनावरांना न बांधता ठेवणे, बोटी सुसज्ज ठेवणे, कुशल मनुष्यबळ तैनात ठेवणे, लाईफ बोया व इतर सामग्रीची तजवीज करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. कोविड सेंटरच्या ठिकाणी वीज खंडित झाल्यास जनरेटर पुरवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. तसेच ऑक्सिजन बफर साठा देखील ठेवण्यात येणार आहे. नागरिकांनी सुरक्षित आणि सतर्क राहण्याच्या सूचना जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी केल्या आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
7:24 PM 08-Jun-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here