फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्यूअल मॅक्रॉन यांच्या कानशिलात लगावली; दोघांना अटक

0

गेल्या वर्षी इस्लामवर वादग्रस्त वक्तव्य केल्यावरून वादाच्या भोवऱ्यात सापडलेले फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्यूअल मॅक्रॉन यांना मंगळवारी एका व्यक्तीने कानशिलात लगावली आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

फ्रान्सच्या सैन्याला सेवा देणाऱ्या एका गटाने नुकतीच मॅक्रॉन यांना इस्लामवरून इशारा दिला होता. इस्लाम धर्माला सवलती दिल्याने फ्रान्सचे अस्तित्व धोक्यात आले आहे. या सैनिकांच्या गटाचे पत्र Valeurs Actuelles मॅग्झीनमध्ये प्रकाशित झाले होते. या मॅग्झीनमध्ये गेल्या महिन्यातही अशाप्रकारचे आणखी एक पत्र प्रकाशित झाले होते. यामध्ये गृह युद्धाचा इशारा देण्यात आला होता. मात्र, य़ा पत्राला मॅक्रॉन यांचे सहकारी जेराल्ड डारमेनिन यांनी असफल प्रयत्न असे म्हटले होते. तसेच पत्र लिहिणाऱ्यामध्ये हिम्मत नाहीय, असे म्हटले होते.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:17 PM 09-Jun-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here