जिल्ह्यातील ८४६ ग्रामपंचायतींपैकी ६५ ग्रामपंचायतींनी कोरोनाला रोखले वेशीवर

0

रत्नागिरी : जिल्ह्यामध्ये गेले दीड वर्ष कोरोनाने थैमान घातले आहे. मागील दोन महिन्यांत तर वर्षभराच्या तुलनेत रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली. राज्य शासनाने सुरू केलेल्या अनलॉकमध्येही जिल्हा चौथ्या स्तरावर असतानाही जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतींनी कोरोनाला वेशीवरच रोखण्यात यश मिळवले आहे. जिल्ह्यातील ८४६ ग्रामपंचायतींपैकी ६५ ग्रामपंचायतींमध्ये एकही कोरोना रुग्ण सापडलेला नसल्याने येथील ग्रामस्थांनी घेतलेल्या सुरक्षेच्या योजनांची प्रशंसा होत आहे.

तालुकानिहाय कोरोनामुक्त गाव :

सर्वाधिक कमी ग्रामपंचायती प्रत्येकी ३ या रत्नागिरी व लांजा तालुक्यात आहेत. खेड व राजापूरमध्ये प्रत्येकी ८, संगमेश्वर ९, चिपळूण ४, गुहागर ५ तर मंडणगड तालुक्यात ७ ग्रामपंचायती या कोरोनामुक्त आहेत. मे अखेरपर्यंत या ग्रामपंचायतींमध्ये एकही कोरोनाचा रुग्ण सापडला नव्हता.

कोरोनामुक्त ग्रामपंचायती
खेड – कर्जी, सवणस, तुंबाड, चौगुले मोहल्ला, जैतापूर, तुळशी खुव बु.आणि भेलसई. दापोली – आडे, गवे, मुगीज, शिरफळ, डौली, आपटी, शिरवणे, करंजाळी, विरसई, साकुर्डे, पोफळवणे, करंजगाव, बावळी बु., देहेण,सुकोंडी, नवसे, कवडोली, भोपण, लांजा – वेरवली खु., पुनस, वडगाव हसोळ. .रत्नागिरी- चरवेली, वळके, मेर्वी राजापूर – आडवली, हरळ, डोंगर, विले, शेडे, राजवाडी. संगमेश्वर – पाचांबे, डावखोल, देवळे, घाटीवळे, ओझर खु., बेलारी बु., देवडे, साखरपा, घोळवली. .चिपळूण – बोरगाव, खोपड, तळवणे, दावणगाव गुहागर – अडूर, मासू, उमराठ, मुंड, कुटगिरी मंडणगड – दाभट, कुड्रप खु., मुरादपूर, पिंपळाली, पडवे, तोंडली, वाल्मिकीनगर

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:35 PM 09-Jun-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here