मराठा आरक्षणासंबंधी चर्चा करण्यासाठी रामदास आठवले शरद पवारांच्या भेटीला

0

मुंबई : मराठा आरक्षणाचा मुद्दा आता थेट दिल्लीपर्यंत गेला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी काल दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी मराठा आरक्षणासाठी ५० टक्के शिथिलता करण्यात यावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे. दरम्यान, याच विषयावर बोलण्यासाठी आज रिपाईचे नेते रामदास आठवले, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि अनेक मंडळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक बंगल्यावर गेले होते. मंत्री रामदास आठवले यांनी याबाबत माहिती दिली आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांपेक्षा वाढता कामा नये ही अट शिथिल करण्यासाठी संविधानात दुरुस्ती विधेयक मंजूर करण्यासाठी संसदेत सर्व पक्षीयांनी एकत्र प्रयत्न करण्याची गरज आहे यावर राष्ट्रवादी काँग्रेस चे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरद पवार यांच्याबरोबर आज सिल्व्हर ओक या निवासस्थानी त्यांची भेट घेऊन मराठा आरक्षण आणि पदोन्नतीमधील मागासवर्गीयांचे आरक्षण या विषयावर चर्चा केली. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे या साठी रिपब्लिकन पक्षाने नेहमी पाठिंबा दिला आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी 50 टक्के आरक्षण मर्यादेची अट रद्द करण्यास सर्व पक्षीयांनी प्रयत्न करावेत ; आपणही केंद्रात प्रयत्न करणार आहोत. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार पदोन्नतीमधील आरक्षणाचा निर्णय राज्य सरकार घेऊ शकते त्यानुसार महाविकास आघाडी सरकारने याबाबत निर्णय घ्यावा याबाबत खा.शरद पवार यांच्याशी चर्चा केली. त्यावर शरद पवार यांनी सांगितले की राज्य सरकार कायदेशीर बाबी तपासून मंत्रीमंडळाशी चर्चा करून याबाबत लवकर अनुकूल निर्णय घेण्याचा आपला प्रयत्न राहील.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:45 PM 09-Jun-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here