खेलो इंडिया व फिट इंडिया मुव्हमेंट च्या धरतीवर कुडाळमध्ये प्रथमच ‘खेलो सिंधूदुर्ग खेलो’

0

सिंधूदुर्ग जिल्ह्यात कुडाळ तालुक्यामध्ये प्रथमच खेलो इंडिया व फिट इंडिया मुव्हमेंट च्या धरतीवर ‘खेलो सिंधूदुर्ग खेलो’ सिंधुदुर्ग जिल्हा अंमेच्युअर अँथलेटिक्स असोसिएशन च्यावतीने व कुडाळ हायस्कुल,कुडाळ सहकार्याने सब ज्युनियर जिल्हास्तरिय निवड चाचणी अँथलेटिक्स स्पर्धा २०१९-२० आयोजित दि.१९ जानेवारी रोजी घेण्यात येणार आहे. या स्पर्धेमध्ये वयोगट ८/१०/१२ वर्षाखालील शालेय मुले-मुली ची राज्यस्तरीय सब ज्युनियर अँथलेटिक्स स्पर्धेसाठी निवड करण्यात येणार आहे.कुडाळ हायस्कुल मैदान,कुडाळ या इथे आपले आधार कार्ड,जन्म तारखेचा दाखल्याची कलर झेरोक्स प्रत व २ पासपोर्ट साइजचे फोटो तसेच जिल्हास्तरिय स्पर्धेची फी रु. १००/- (प्रत्येकी क्रीडा प्रकार ) सोबत घेऊन येणे. या स्पर्धेमधुन वयोगट ८/१०/१२ वर्षाखालील मुला-मुलींची निवड राज्यस्तरीय सब ज्युनियर अँथलेटिक्स स्पर्धेसाठी केली जाईल. अधीक माहितीसाठी संपर्क समीर राऊत (सह.सचिव ) ७९००१९७४७५/ ८९२८८८३५९४व कु.अंजली गायकवाड ७५८८५०४६७०या क्रमांकावर संपर्क साधावा,असे अहवान संघटनेचे अध्यक्ष रणजितसिंग राणे यांनी केले आहे.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here