तुमसर मधमाश्यांच्या हल्ल्यात चौघेजण जखमी

0

देवरुख : मुंबई-गोवा महामार्गावर संगमेश्वर नजिकच्या शिंदे आंबेरी येथे तुमसर मधमाश्यांच्या हल्ल्यात प्राथमिक आरोग्य केंद्रातील दोन कर्मचाऱ्यांसहित एकूण चौघे जखमी झाले आहेत. या चौघांनाही उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. संगमेश्वर तालुक्यातील महामार्गावरील शिंदे आंबेरी येथे साफसफाईचे कामं सुरू असताना ‘तुमसर’ जातीच्या मधमाश्यांच्या पोळ्याला चूकून हाताचा स्पर्श झाला आणि पोळ्यातून माश्या उठल्याने लोकांनी तिथून पळ काढला. त्याचं वेळी रविंद्र खसासे व दामू खसासे यांच्यावर मधमाश्यांनी हल्ला केला त्यात ते जखमी झाले. याच दरम्यान या मार्गाने दुचाकीवरून तुरळकडे लसीकरणासाठी जाणारे आरोग्य केंद्रातील कर्मचारी विश्वनाथ जाधव आणि रेखा भुवड यांच्यावर देखील मधमाश्यांनी हल्ला चढवला. याच दरम्यान या मार्गाने दुचाकीवरून तुरळकडे लसीकरणासाठी जाणारे आरोग्य केंद्रातील कर्मचारी विश्वनाथ जाधव आणि रेखा भुवड यांच्यावर देखील मधमाश्यांनी हल्ला चढवला. दरम्यान, यावेळी विजय कुवळेकर यांनी प्रसंगावधान दाखवून जखमींना उपचारासाठी दाखल केले त्याबद्दल त्यांचे पंचक्रोशीत अभिनंदन होत आहे. माश्यांनी हल्ला करताच कर्मचारी घाबरून गेले. रेखा भुवड जवळच शेतात काम करत असणाऱ्या लोकांकडे धाव घेतली आणि जाधव मात्र मदतीच्या शोधात होते. त्याच वेळी विजय कुवळेकर यांच्या निदर्शनास ही बाब आली तेव्हा त्यांनी क्षणाचाही विलंब न करता जाधव यांना तातडीने गाडीत बसवले आणि कडवई प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. आरोग्य अधिकारी संतोष यादव यांनी जाधव यांच्यावर उपचार सुरू केले तर रेखा भुवड यांना उपचारासाठी सावर्डे येथे हलविण्यात आले अन्य दोघांनी खाजगी दवाखान्यात उपचार घेतले. विजय कुवळेकर यांनी प्रसंगावधान दाखवून जखमींना उपचारासाठी दाखल केले त्याबद्दल त्यांचे पंचक्रोशीत अभिनंदन होत आहे. आरोग्य कर्मचारी विश्वनाथ जाधव यांनी सुध्दा विजय कुवळेकर यांचे आभार मानले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:28 AM 10-Jun-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here