युवा नेते आ. नितेश राणे यांनी अखेर कोळपेवासियांना दिलेला शब्द पूर्ण केला आहे. आ. नितेश राणे यांच्या माध्यमातून कोळपे गावात रिलायन्स जिओ कंपनीचा मोबाइल टॉवर मंजूर झाला आहे. गावात लवकरच जिओ कंपनीचा ४ जी इंटरनेट मनोरा उभा राहत असल्याने युवावर्ग व बाहेर गावी राहणाऱ्या नागरिक, ग्राहकांत समाधान व्यक्त केले जात आहे. गावात मोबाईल टॉवर व्हावा अशी मागणी गेले अनेक वर्ष कोळपेवासियांची होती. भाजपा युवा नेते हुसेन लांजेकर व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी टॉवर संदर्भात आमदार नितेश राणे यांच्याकडे निवेदन सुपूर्द केले होते. डिसेंबर २०१८ मध्ये आ. नितेश राणे यांच्या फंडातून मंजूर असलेल्या कामांची भूमिपूजने व पक्षाचा मेळावा गावात पार पडला. या मेळाव्याला आ. नितेश राणे यांनी स्वतः उपस्थित राहत रिलायन्स कंपनीच्या अधिकाऱ्यांना ही पाचारण केले होते. दरम्यान गावात लवकरच जिओ टॉवर दिसेल असा शब्द भाषणातून आ. नितेश राणे यांनी ग्रामस्थांना दिला होता. त्यांनी दिलेला शब्द पूर्ण केला आहे. आ. नितेश राणे यांच्या प्रयत्नातून हा टॉवर मंजूर झाला आहे. टाँवर मंजुरीचे पत्र रिलायन्स जिओ प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने कोळपे ग्रामपंचायतीला दिले आहे. या टॉवरचा फायदा कोळपे गावासह तिथवली, नानिवडे, वेंगसर व उंबर्डे या गावांना देखील चांगल्या प्रकारे होणार आहे. या परिसरात सध्या बीएसएनएलची सेवा सुरू आहे. परंतु वारंवार टॉवरमध्ये बिघाड होत असल्याने ही सेवा बेभरवशा झाला होती. आता मात्र जिओ कंपनीची ४ जी सेवा गावात उपलब्ध होणार असल्याने मोबाईल ग्राहकांत समाधान व्यक्त होत आहे. कार्यसम्राट आ. नितेश राणे यांचे कोळपेवासिंयांकडून आभार व्यक्त केले जात आहेत.
