पाग येथे स्कूल बसच्या चाकाखाली सापडल्याने वृध्दाचा जागीच मृत्यू

0

शहरातील पाग येथे स्कूल बसच्या मागील चाकाखाली सापडल्याने वृध्दाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली. याची नोंद येथील पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.गजानन बाबुराव सावंत (८२) असे मृत्यू झालेल्या वृध्दाचे नाव आहे. याबाबतची खबर प्रमोद शंकर ठसाळे (५०) यांनी दिली आहे. यानुसार शिक्षण प्रसारक मंडळी पुणेच्या परशुराम येथील बसवरील चालक रामदास सिताराम जाधव आपल्या ताब्यातील स्कूल बस पाग येथून पॉवर हाऊसच्या दिशेने घेऊन येत होते. यावेळी ही गाडी घेऊन उघडा मारुती मंदिर परिसरात आले असता घराजवळील पायरीवर उभे असलेले गजानन जाधव मागील चाकाखाली सापडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. यानंतर पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांच्यासह पोलीस हवालदार नरेश पेढांबकर, दिपक ओतारी आदी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. अधिक तपास चिपळूण पोलीस करीत आहेत.

HTML tutorial


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here