जनकल्याण समितीतर्फे गुहागर रुग्णालयाला ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर

0

गुहागर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्याण समितीने गुहागर येथील ग्रामीण रुग्णालयाला दोन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर भेट दिले. ही भेट संघाच्या कार्यकर्त्यांनी ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. बळवंत आणि मुख्य परिचारिका अनिता मालप यांच्याकडे सुपूर्द केली. गुहागर तालुक्याचे संघचालक डॉ. मंदार आठवले, प्रथमेश पोमेंडकर, प्रतीक कदम, केदार खरे, ऋषिकेश भावे आणि मयूरेश पाटणकर या रा. स्व. संघाच्या कार्यकर्त्यांनी हे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर ग्रामीण रुग्णालयाच्या स्वाधीन केले.नैसर्गिक आपत्तीमध्ये पुढाकार घेऊन काम करणाऱ्या रा. स्व. संघाच्या जनकल्याण समितीतर्फे अनेक सेवा प्रकल्प चालविले जातात. गुहागर तालुक्यातील २० जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘फिरती विज्ञान प्रयोगशाळा’ हा उपक्रम राबविला जातो. शृंगारतळी येथे रुग्णोपयोगी साहित्य केंद्रामार्फत अत्यंत कमी दरामध्ये रुग्णांना साहित्य भाड्याने दिले जाते, असे अनेक प्रकल्प जनकल्याण समितीतर्फे राज्यात सुरू आहेत. कोरोना संकटातही संघ कार्यकर्त्यांनी मार्च २०२० पासून अनेक ठिकाणी कोरोना रुग्णांना मदत करणे, शहरांमधील दाट वस्तीच्या भागात तपासणी करणे, कोविड केअर सेंटर चालविणे अशी अनेक कामे सुरू आहेत.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:19 PM 10-Jun-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here