नव्या अपडेटनुसार १० ते १४ जून रोजी जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता

0

◾ संचारबंदी बाबत अजूनही आदेश नाहीत

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी : भारतीय हवामान खात्यातर्फे जारी करण्यात आलेल्या ताज्या बातमीपत्रानुसार १० ते १४ जून या कालावधीत मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या सर्व कालावधीत रत्नागिरीसह लगतच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे या कालावधीत सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता असून सोबतच मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. या कालावधीत आवश्यकतेनुसार जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात येणार असल्याची माहिती यापूर्वीच जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली आहे. अद्यापही आवश्यकता भासली नसल्याने याबाबत आदेश न काढल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
03:25 PM 10/Jun/2021

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here