मालवणीत दुर्घटना : केंद्र सरकारकडून मृतांच्या नातेवाईकांसाठी मदत जाहीर

0

मुंबई : मुंबईतील मालाड पश्चिमेकडील मालवणी भागात इमारत कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 8 जण गंभीर जखमी झाले आहे. सध्या जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहे. मालवणी दुर्घटनेतील मृतांच्या नातेवांईकांना केंद्र सरकारकडून 2 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर, राज्य सरकारकडून 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत बुधवारी (9 जून) रात्री 11 वाजता ही दुर्घटना घडली. मालाड पूर्व या ठिकाणी मालवणी गेट क्र. 8 येथे अब्दुल हमीद मार्गावर न्यू कलेक्टर कंपाऊंड परिसरात एका 3 मजली इमारतीचा दुसरा व तिसरा मजला बाजूला असलेल्या 1 मजली चाळीवर कोसळला. त्यामुळे मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 11 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर 8 जण गंभीर जखमी झाले आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:51 PM 10-Jun-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here