पावस मधील कोरोना विलगीकरण केंद्राचे ना. उदय सामंत यांच्या हस्ते लोकार्पण

0

रत्नागिरी : कोरोना संसर्ग टाळण्यासाठी गावात लक्षणे नसलेला कोरोना रुग्ण सापडल्यास त्याला तात्काळ विलगीकरण कक्षात दाखल करा अशा सूचना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिले. फणसोप येथील श्री देवलक्ष्मी केशव माध्यमिक विद्यालय, कसोप-फणसोप येथे तयार करण्यात येत असलेल्या विलगीकरण केंद्राची पाहणी त्यांनी केली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष उदय बने, जिल्हा परिषद आरोग्य सभापती बाबू महाप, रत्नागिरीचे नगराध्यक्ष बंडया साळवी, तालुका आरोग्य अधिकारी गावडे आदि मान्यवर उपस्थित होते. सामंत यांनी येथील परिसरातील कोरोना रुग्ण, लसीकरण आदि विषयांचा आढावा यावेळी घेतला. लसीकरण केंद्रावर लसीकरण सकाळी वेळेत सुरु करण्याच्या सूचना यावेळी त्यांनी संबंधितांना दिल्या.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

▪️ पावस येथील विलगीकरण केंद्राचे लोकार्पण

ग्रामंपचायत पावस व स्वामी स्वरुपानंद सेवा मंडळ, पावस यांच्या संयुक्त विद्यमाने भक्त निवास, पावस येथे तयार करण्यात आलेल्या 28 बेडची व्यवस्था असलेल्या विलगीकरण केंद्राचे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते लोकार्पण झाले. यावेळी सामंत यांनी या भागातील लसीकरण आणि रुग्ण याबाबतचा आढावा घेतला. या भागामध्ये विलगीकरण केंद्र तयार झाल्याने कोरोना संसर्ग टाळण्यास मदत होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष उदय बने, जिल्हा परिषद आरोग्य सभापती बाबू महाप, रत्नागिरीचे नगराध्यक्ष बंडया साळवी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर आदि मान्यवर उपस्थित होते.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:17 PM 10-Jun-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here