कितीही संकट येवोत, महाराष्ट्र कधीही झुकला नाही, झुकणार नाही : अजित पवार

0

मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा आज (१० जून) २२ वा वर्धापन दिन आहे. या दिनानिमित्त मुंबईत कार्क्रम आयोजित केला असून त्या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केले आहे. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं. आपलं सरकार स्थिरस्थावर होत नाही तोच कोरोनाचं संकट आलं. मधल्या काळात राज्यात दोन वादळं येऊन गेली. या संकटाचा आघाडी सरकारने सामना केला, असं सांगतानाच कितीही संकट येवोत, आव्हान येवोत महाराष्ट्र कधी झुकला नाही आणि झुकणार नाही, असं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ठणकावून सांगितलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा आज २२ वा वर्धापन दिन आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांशी संवाद साधतना अजित पवार बोलत होते. राज्यात आघाडीचं सरकार आल्यानंतर नैसर्गिक संकटं आली. या संकटाचा आपण सामना केला. यापुढेही आपल्याला आव्हानाचं रुपांतर संधीत करावं लागणार आहे. महाविकास आघाडी सरकारने लोककल्याणाची कामं केली आहेत. ही कामे लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे, असं पवार म्हणाले आहेत.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:36 PM 10-Jun-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here