दहावीच्या विद्यार्थ्यांचे निकाल लवकरच

0

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचे निकाल तयार करण्यासाठी वेळापत्रक निश्‍चित करण्यात आले आहे. त्यानुसार निकालासाठी आवश्‍यक असलेली मूल्यमापन प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. आता शाळांना निकाल तयार करण्याच्या कामाला लागावे लागणार असून 30 जूनपर्यंत निकालाची सर्व प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.अंतर्गत मूल्यमापनाद्वारे हा निकाल लावण्यात येणार असून त्याबाबतचा आराखडाही जाहीर करण्यात आलेला आहे. निकाल तयार करण्यासाठी शाळा स्तरावर निकाल समितीही गठीत करण्याचे बंधन आहे. इयत्ता नववीसाठी 50 टक्के व दहावीसाठी 50 टक्के अशा एकूण 100 टक्के गुणांनुसार मूल्यमापन करण्यात येणार आहे.निकाल तयार करण्याची कार्यपध्दतीही ठरवून देण्यात आलेली आहे. यात नियमित विद्यार्थी, पुनर्परीक्षार्थी, खासगी विद्यार्थी, तूरळक विषयक घेऊन प्रविष्ट होणारे विद्यार्थी, श्रेणीसुधार अंतर्गतचे विद्यार्थी या सर्वांच्या निकालाच्या कार्यपद्धती निश्‍चित झालेल्या आहेत.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:41 PM 10-Jun-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here