‘चंद्रकांत पाटील निरागस आणि निष्कपट, लहान मुल बडबड करतं तसा आनंद घ्यायचा’

0

धुळे : चंद्रकांत पाटील यांचा आज वाढदिवस आहे त्यांनी वाढदिवस साजरा करावा. घरी गोडधोड खावं. कार्यकर्त्यांनी आणलेले केक कापावेत, विशेष लहान मुलाप्रमाणे चंद्रकांत पाटलांकडे पाहावे. चंद्रकांत पाटील अत्यंत गोड माणूस आहेत. ते अत्यंत निरागस आणि निष्कपट आहेत. लहान मुलं कसं बडबड करतं तसा आनंद घ्यायचा असतो, असा शब्दात फिरकी घेतशिवसेना खासदार संजय राऊत यांनी टोला लगावला आहे. चंद्रकांत पाटील यांच्या ‘आम्ही जंगलात असणाऱ्या वाघाशी दोस्ती करतो, पिंजऱ्यातल्या वाघाशी नाही’ या वक्तव्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, शिवसेना काय आहे, कोण वाघ आहे हे देशानं पाहिलं आहे. या वाघांची जातकुळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहून कळतंच. या वाघानं तुम्हा सगळ्यांना खेळवलं आणि लोळवलं सुद्धा आहे, असं राऊत म्हणाले.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:09 PM 10-Jun-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here