परमबीर सिंग यांना अंतरिम दिलासा; १५ जूनपर्यंत ना अटक, ना कठोर कारवाई

0

मुंबई : ॲट्रॉसिटीच्या प्रकरणात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना उच्च न्यायालयाने गेल्या सुनावणीदरम्यान अंतरिम दिलासा दिला होता. ९ जूनपर्यंत त्यांना अटक न करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले होते. आज पुन्हा मुंबई उच्च न्यायालयात १५ जूनपर्यंत ॲट्रॉसिटीच्या प्रकरणात अटक करणार नाही किंवा कोणतीही कठोर कारवाई करणार नाही, अशी ग्वाही राज्य सरकारच्या वतीने देण्यात आली आहे. मात्र, तोपर्यंत परमबीर यांची ठाणे पोलीस करत असलेला गुन्हा रद्दबातल करण्याबाबतच्या याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. पुढील सुनावणी सोमवारी घेण्यात येईल.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:32 PM 10-Jun-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here