अफगाणिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांना भेटायला गेलो नव्हतो; राकेश टिकैत यांचा संताप

0

नवी दिल्ली : केंद्राच्या वादग्रस्त कृषी कायद्याच्या विरोधात गेल्या सहा महिन्यांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. भारतीय किसान युनियनचे नेते आणि प्रवक्ते राकेश टिकैत या आंदोलनाचे नेतृत्व करत आहेत. कोरोनाच्या संकटामुळे शेतकरी आंदोलन प्रभावित झाले होते. मात्र, कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत असून, आता पुन्हा एकदा शेतकरी आंदोलन तीव्र करण्यासाठी राकेश टिकैत यांनी कंबर कसल्याचे पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर राकेश टिकैत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतली. मात्र, यानंतर अफगाणिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांना भेटायला गेलो नव्हतो, असा पलटवार राकेश टिकैत यांनी केला आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतली. अफगाणिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांना भेटायला गेलो नव्हतो, ज्यासाठी भारत सरकारची परवानगी घ्यावी लागेल. आपल्या देशात मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी व्हिजा लागतो का, असे खोचक सवाल करत अन्य राज्यातील मुख्यमंत्र्यांनाही आम्ही भेटणार आहोत, असे राकेश टिकैत यांनी स्पष्ट केले.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:32 PM 10-Jun-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here