देवरूख अपना बँकेच्या ९ व्या वर्धापनदिनानिमित्त भव्य ग्राहकपेठ कार्यक्रमाचे आयोजन

0

अपना बँकेच्या ९ व्या वर्धापनदिनानिमित्त १६ ते १८ या कालावधीत देवरूख येथे भव्य ग्राहकपेठ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. संक्रांत स्पेशल हा कार्यक्रम असून महिलांसाठी विविध स्पर्धा घेण्यात येणार आहेत. शहरातील खालची आळी येथील नक्षत्र सभागृहात हा कार्यक्रम दररोज सकाळी ११ ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत घेण्यात येणार आहे. विविध स्पर्धा, खाद्यपदार्थांचे स्टॉल, काईट सेल्फी पॉईंट, संक्रांतीसाठी लागणाऱ्या वाण साहित्यांचा स्टॉल, बँक आणि विमा मार्गदर्शन स्टॉल या ग्राहकपेठेचे खास आकर्षण ठरणार आहे. तसेच कार्यक्रमांतर्गत सॅलेड डेकोरेशन स्पर्धा, ब्रायडल मेकअप स्पर्धा, ५० वर्षावरील महिलांसाठी चित्रकला स्पर्धा, सर्वात मोठा लाडू बनविण्याची स्पर्धा व लहान मुलांसाठी हस्ताक्षर स्पर्धा घेण्यात येणार आहे. १६ जानेवारी रोजी सायंकाळी ४ वा. हळदी कुंकू समारंभ पार पडणार आहे. या कार्यक्रमाला देवरूखातील महिलांनी आवर्जून भेट द्यावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here