लायन्स क्लब रत्नागिरी सर्व महाराष्ट्र मध्ये अव्वल स्थानावर

0

रत्नागिरी : सर्व रत्नागिरीला अभिमान वाटावा अशी कामगिरी लायन्स क्लब ऑफ रत्नागिरी ने केली आहे. गेले वर्षभर गेल्या मार्च पासून आता जून पर्यंत लायन्स क्लबच्या पदाधिकारी ला श्रेया केळकर मनाली राणे व डॉ शिवानी पानवलकर यांनी नियोजपूर्वक कार्याची आखणी करून रत्नागिरी आणि परिसरातील विविध गावा गावातून लायन्स क्लबच्या मदत कार्याचा धडाका लावला. आरोग्य तपासणी, शिबिरे डोळे तपासणी शिबिरे, शाळा मधून मुलींसाठी आरोग्य योजनेची अंमलबजावणी करणे, शेतकऱ्यांना मदत, गरजू लोकांना कुटुंबांना आर्थिक व वस्तू स्वरूपात मदत, जनतेसाठी अध्यावत शवपेटी, सर्वांसाठी अनेक विविध विषयावरील ऑनलाईन प्रबोधन मार्गदर्शन सेमिनार अशा 400 हून अधिक सेवा कार्य लायन्स क्लब रत्नागिरी तर्फे गेले वर्षभर आयोजित केली गेली. सर्व जग कोविड मुळे ठप्प असताना लायन्स क्लबच्या माध्यमातून केलेल्या या उत्कृष्ट कार्याची दखल लायन्स इंटरनॅशनल कडून घेतली गेली. काल पार पडलेल्या लायन्स मल्टिपल च्या महाराष्ट्रातील 508 क्लब च्या 20 हजार हून जास्त सदस्या मधून हे सर्व अभिमानास्पद सामाजिक कार्य करणाऱ्या लायन्स च्या पदाधिकारी अध्यक्षा श्रेया केळकर यांना बेस्ट प्रेसिडेंट मल्टिपल म्हणून तीन गोल्ड मेडल. सचिव मनाली राणे यांना उत्कृष्ट सचिव कार्य बद्दल सिल्व्हर मेडल व क्लब च्या खजिनदार रत्नागिरीतील नामवंत डॉ शिवानी पानवलकर यांना मल्टिपल मधील बेस्ट खजिनदार चे प्लॅटिनम अवॉर्ड ने यांना सन्मानित करण्यात आले. क्लब चे ज्येष्ठ सदस्य व मार्गदर्शक डॉ संतोष बेडेकर यांनी ही लायन्स मधील योगदान बद्दल गोल्ड मेडल ने सन्मानित करण्यात आले आहे. लायन्स क्लब रत्नागिरीच्या 48 वर्षाच्या इतिहासात प्रथमच एवढी सन्माननीय अवॉर्ड ने या सदस्यांच्या अजोड कार्याचा गौरव करण्यात आला आहे. सर्व लायन्स सदस्य आणि सर्व रत्नागिरीतील नागरिकांना अभिमान वाटावा अशी कामगिरी लायन्स क्लबच्या माध्यमातून आज महाराष्ट्र मध्ये नावाजली गेली आहे. लायन्स च्या या यशस्वी टीम चे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
8:31 PM 10-Jun-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here