राज्यभरात मुसळधार पावसाची शक्यता

0

गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाचा सामना करत असलेल्या राजधानी मुंबईमध्ये आज (२९) पुन्हा पाऊस थैमान घालण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने मुसळधार पावसाचे भाकित केले आहे. 

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राजधानी मुंबईसह उपनगर तसेच रायगड जिल्ह्यातही मुसळधार पावसाचा अंदाज आहे. त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा अंदाज आहे. पावसाने थैमान घातल्याने मुंबईमध्ये जनजीवन पूर्णतः कोलमडून पडले आहे.  

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुणे, कोल्हापूर, सातारा, नाशिकमध्ये आज धुवाँधार होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर नंदूरबार, जळगाव, धुळे, औरंगाबाद, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद तसेच जालनामध्येही पावसाची शक्यता आहे.  

मुंबईमध्ये होत असलेल्या संततधारेने विभागातील धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. दुसरीकडे राज्याचे वरदायिनी असलेल्या कोयना धरणही जवळपास ६० टक्के भरले आहे.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here