भारत- बांगलादेश सीमेवर चीनी घुसखोराला अटक

0

मालदा : बांगलादेशातून अवैधपणे भारतीय सीमेत प्रवेश करणाऱ्या एका चीनी नागरिकाला भारतीय सीमा सुरक्षा दलाने गुरुवारी (बीएसएफ) अटक केलीय. होन जू असे या 36 वर्षीय चीनी नागरिकाचे नाव असून त्याच्याकडून सुरक्षा दलाने लॅपटॉप आणि पासपोर्ट जप्त केलाय. पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यातील भारत- बांगलादेश सीमा भागात बीएसएफची -159 नंबर बटालियन पेट्रोलिंग करत असताना मानिकचकला लागून असलेल्या सीमेतून एक चीनी इसम भारतीय हद्दीत प्रवेश करत असल्याचे आढळून आले. या चीनी व्यक्तीच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्याची चौकशी करण्यात आली. त्यानंतर बीएसएफने त्याला अटक केली. होन जू असे या 36 वर्षीय चीनी नागरिकाचे नाव आहे. सुरक्षा दलाने त्याच्याकडून लॅपटॉप, चीनी पासपोर्ट आणि बांगलादेशी व्हिसा जप्त केलाय. होन जूं याला सध्या मानिकचक पोलिस ठाण्यात नेण्यात आले असून विविध सुरक्षा यंत्रणांकडून त्याची चौकशी सध्या सुरू आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:37 PM 11-Jun-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here