“हम भी तो है” या हिंदी सिने-गीतगायन स्पर्धेचे रत्नागिरीमध्ये आयोजन

0

असेंट म्युझिक आणि जायंट्स वेलफेअर फाउंडेशन (फेडरेशन 2ड) तर्फे गायकांसाठी येत्या फेब्रुवारीत “हम भी तो है” या हिंदी सिने-गीतगायन स्पर्धेचे आयोजन केले आहे. पूर्णपणे हिंदी चित्रपटगीतांची अशी असलेली, आणि सर्व वयोगटांचा समावेश असलेली अशी ही रत्नागिरीतील पहिलीच स्पर्धा असून स्पर्धेची प्राथमिक फेरी ९ फेब्रुवारीला, दुसरी १६ फेब्रुवारीला होणार आहे. त्यामध्ये निवड झालेल्या स्पर्धकांना २२ फेब्रुवारीला होणाऱ्या अंतिम फेरीत सादरीकरण करता येणार आहे. सदर स्पर्धा १५ ते ३५ वर्षे, ३६ ते ५५ वर्षे आणि ५५ वर्षांवरील खुला गट अशा तीन गटांत घेण्यात येणार आहे. सध्या अनेक दूरदर्शन वाहिन्यांवर चालू असलेल्या रिअॅलिटी शोजची तयारी करण्यासाठी ही स्पर्धा खूपच उपयोगी ठरणार आहे. रत्नागिरीतील रा. भा. शिर्के प्रशालेत स्पर्धेच्या पहिल्या दोन फेऱ्या होतील. स्पर्धेत सशुल्क भाग घेता येईल. त्याकरिता विहार स्टोअर्स (योगेश पटवर्धन, एम. जी. रोड, विठ्ठल मंदिराजवळ, रत्नागिरी), इन वोग ब्युटिक (शलाका संधू, 8/A, आनंद सागर अपार्टमेंट, ICICI बँकेसमोर, उद्यमनगर रोड, रत्नागिरी), खादाड़ी कट्टा (उदय गोखले, ल. वि. केळकर सभागृहाजवळ, जोशी पाळंद, रत्नागिरी), आगाशे डिपार्टमेंटल स्टोअर्स (गौरांग आगाशे, नाचणे-साळवी स्टॉप लिंक रोड, रत्नागिरी), गणेश मेडिकल आणि जनरल स्टोअर्स (प्रशांत सोहनी, रेल्वे स्टेशनसमोर, कुवारबाव, रत्नागिरी), सागर भांडार (राहुल सुर्वे, माळ नाका, रत्नागिरी), स्नॅक अँड पॅक (शेखर पटवर्धन, मारुती मंदिर, रत्नागिरी) येथे प्रवेशिका उपलब्ध आहेत. itsmyshow.in या लिंकवरून ऑनलाइन अर्जही भरता येतील. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी 9673039761, 8237292706, 9833315801 किंवा 8329112187 या मोबाइलवर संपर्क साधावा, असे आवाहन असेंट म्युझिकचे चिंतामणी सोहनी आणि जायंट्स वेल्फेअर फाऊंडेशनचे संजय पाटणकर यांनी केले आहे.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here