पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने जिल्ह्याला व्हेंटिलेटरची मदत

0

रत्नागिरी : शिवसेना नेते आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने जिल्ह्यासाठी 14 व्हेंटिलेटर देण्यात आले. त्यापैकी रत्नागिरीतील 5 व्हेंटिलेटरचे शुक्रवारी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी रत्नागिरी जिल्ह्यासाठी ऑक्सीजन कॉन्सेंटेटरपाठोपाठ व्हेंटिलेटरची मदत केली आहे. जिल्ह्यासाठी देण्यात येणार्‍या व्हेंटिलेटरचे गुरुवारी राजापूरमध्ये लोकार्पण झाले. राजापूरमध्ये 3 व्हेंटिलेटर देण्यात आले. आज रत्नागिरीमध्ये 5 व्हेंटिलेटर देण्यात आले असून चिपळूण आणि दापोलीमध्येही प्रत्येकी 3 व्हेंटिलेटर देण्यात येणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. यावेळी आमदार राजन साळवी, नगराध्यक्ष प्रदीप साळवी, निवासी जिल्हाधिकारी दत्ता भडकवाड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़.बबीता कमलापूरकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.संघमित्रा फुले व इतर मान्यवर उपस्थित होते.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
7:20 PM 11-Jun-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here