बिजेपीने नळपाणी योजनेत अडथळा आणला नसता तर आज रत्नागिरीतील रस्ते चकाचक झाले असते : बंड्या साळवी

0

रत्नागिरी : शहराच्या नळपाणी योजनेत सेटिंग न झाल्याने बीजेपीने या कामात स्टे घेतला यामुळेच शहराच्या नळपाणी योजनेला विलंब होऊन रस्त्याची कामे लांबली असल्याचा आरोप नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी केला आहे. माजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दबावामुळेच रत्नागिरीची नळपाणी योजना तब्बल १३ महिने रखडली असा घणाघात नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी केला आहे. रत्नागिरीचे रस्ते आणि इतर प्रश्न उचलत आज बीजेपी जिल्हाध्यक्ष दीपक पटवर्धन यांनी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. यावर पलटवार करताना नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी दीपक पटवर्धन यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. दीपक पटवर्धन एक चांगले वकील आहेत, त्यांनी आपला एकसूत्री कार्यक्रम कोर्टात करावा. ना. सामंत यांच्यामुळे रत्नागिरीला १० कोटींचा निधी मिळाला. कोकणात आलेलं वादळ, पाऊस यामुळे कामाला विलंब झाला, लॉक डाऊन, कोरोनामुळे विकासाची कामे लांबली. रत्नागिरीची जनता बाळासाहेबांना आणि शिवसेनेला मानणारी आहे. चुकीच्या पद्धतीने रत्नागिरीतील जनतेला भडकावून नका असा इशारा बंड्या साळवी यांनी दिला आहे. ते म्हणाले कि मागील नगराध्यक्ष आणि ग्रामपंचायत निवडणुकीत बिजेपीची काय अवस्था झाली हे सर्वाना चांगले माहित आहे. मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत देखील दीपक पटवर्धन निवडून येण्यामागे शिवसेनेचा सिंहाचा वाटा होता, असा टोला नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी लगावला आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
8:41 PM 11-Jun-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here